भुसावळ येथे राष्ट्रीय लसीकरण दिवस संपन्न
आरोग्य कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामाचा सन्मान सोहळा
भुसावळ (प्रमोद बावस्कर) भुसावळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती येथे सन 2021 22 वर्षात राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संगीता पांढरे तालुका वैद्यकीय अधिकारी, विलास भाटकर गट विकास अधिकारी भुसावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भुसावळ तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केली असता फंटलाइट आरोग्य कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बु .येथे कार्यरत असलेल्या विजया मोहोळ यांना उत्तम प्रकारे ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची उत्तम काम केल्या असता, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता पांढरे, गटविकास अधिकारी पं स विलास भाटकर यांच्या हस्तेप्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्वांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.