पहूर येथे सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण
पहूर, ता. जामनेर (ईश्वर चौधरी) येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आज शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद यांच्या सहकार्याने १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले .
महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांच्या हस्ते लसीकरण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर भर देत आहे. ही कौतुकाची बाब आहे. लसीकरण अभियानात सहभागी कोरोना योद्ध्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी लसीकरण पथकातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक आर.बी. पाटील, रामकृष्ण भिवसने, रोहित श्रीखंडे, श्रद्धा वालवकर यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी वर्ग शिक्षक हरिभाऊ राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. आभार चंदेश सागर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.