महाराष्ट्र

धुळे महापालिका बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणातील तो आणखी एक डॉक्टर व परिचारिका कोण

साक्री (सतीश पेंढारकर) एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविशिल्डच्या ७४ लस देण्यात आल्या होत्या. या केंद्राचा यूजर आयडी व पासवर्ड या ओळख साधनांची डिजिटली चोरी करून २०८० जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. तसेच ४ व ६ डिसेंबर २०२१ रोजी लसीकरण बंद असताना ११११ लोकांना लसीकरण करण्यात आल्याची खोटी नोंद करण्यात आली असून प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येकी ५०० रुपये घेऊन बोगस लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

मालेगाव येथील एका व्यक्तीने धुळे येथे घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ते बनावट असल्याचा संशय आल्याने मालेगाव महापालिकेने सदर प्रमाणपत्राबाबत चौकशी करावी, असे धुळे महापालिकेला एका पत्राद्वारे कळविले होते. चौकशीअंती सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा खरा प्रारंभ झाला. या सुतावरून माग काढत चौकशी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाने महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकाऱ्यासह चौघांना अटक केली आहेच. परंतु, अजूनही काही अधिकारी या प्रकरणात अडकले असून त्यांनाही काही दिवसात बेड्या पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अजून एक सूत्रधार वैद्यकीय अधिकारी व परिचारिका फरार असून त्यांना अटक झाली तर या प्रकरणातील गुन्हेगारांची साखळीच जनतेसमोर येऊ शकेल. धुळे महापालिका आरोग्य विभागासह इतरही शासकीय आरोग्य केंद्र पर्यंत सदर प्रकरणाचे धागेदोरे असू शकतात त्यासाठी त्या पातळीवरही प्रामाणिक चौकशी अधिकारी नेमून तपास होणे गरजेचे आहे.

धुळे असे म्हणतात की, ‘जो दुनिया मे नही होता वह धुलियामे होता है’ हे मार्मिक विधान तंतोतंत खरे करण्याचे कृत्य येथील काही थोर माणसे वेळोवेळी करीत असतात आणि त्यांच्यामुळेच धुळे शहराचे नाव सर्वत्र चर्चिले जाते. धुळे जिल्हा परिषद घोटाळा महापालिका जळीत प्रकरण वेळोवेळी होणारे बांधकाम घोटाळे बोगस डीएड प्रकरण आधी काही प्रकरणे म्हणजे याची ठळक उदाहरणे होत भ्रष्टाचाराच्या या गौरवशाली इतिहास धुळे महापालिका आरोग्य विभागातील बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणाने आणखी भर घातली आहे. लसीकरण व प्रमाणपत्र वाटपाचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत महापालिकेत जोरदार आंदोलन करण्यात आले होते.

सदर आंदोलनाकडे प्रारंभी मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले तरी या आंदोलनाचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत ठळकपणे उमटले व समितीचे सदस्य शितल नवले नागसेन बोरसे व सुनील बैसाणे यांनी या विषयावर आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात तथ्य असल्याचे जाहीर केल्यानंतर प्रकरणाच्या सविस्तर चौकशी साठी सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांची नियुक्ती होऊन शहर पोलीस ठाण्यात दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला गेला गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची जास्त चर्चा सुरू झाली असली तरी सदर प्रकरण दडपण्याचा व या प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या राजकीय वर्तुळात व माध्यमांमध्ये जोरदार सुरू होती असे असले तरी पोलिस खात्याने आपल्या कर्तव्यात कसूर न करता सदर प्रकरणातील अज्ञात व्यक्ती महापालिकेतूनच शोधून काढल्या गेल्या आठवड्यातच भर पहाटेच्या गुलाबी थंडीत मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांचं डॉक्टर प्रशांत पाटील व ब्रदर उमेश पाटील यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भर थंडीच्या मोसमात या प्रकरणाची गरमागरम चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगू लागली. मात्र या चौघांना अटक व या प्रकरणाचे आज प्रत्यक्ष दिसणारे चित्र हे फक्त हिमनगाचे टोक असून यामागे आरोग्य क्षेत्रातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फार मोठे रॅकेट असल्याचे काही विश्वसनीय वृत्तांत कडून सांगितले जात आहे.

या प्रकरणातील खरा सूत्रधार असलेला आणखी एक डॉक्टर व परिचारिका कोण याचा शोध सुरू असून त्यांना अटक झाली तर अजून काही धागेदोरे समोर येऊन आरोग्य क्षेत्रातील फार मोठी लुटारू टोळी गजाआड होणार आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणाचा संबंध केवळ धुळे मनपा आरोग्य विभाग पुरताच मर्यादित नसून धुळे व आजूबाजूच्या जिल्ह्यातील जिल्हा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे पर्यंत ही भ्रष्ट साखळी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्या पातळीवर ही व्यापक स्तरावर कठोर व प्रमाणे चौकशी अधिकाऱ्यांमार्फत तपास करणे गरजेचे आहे तरच या प्रकरणातील खरे डाकू गजाआड होऊन धुळे शहर व जिल्ह्याची राज्यभरात नव्हे तर देशभर होणारी बदनामी थांबेल, अन्यथा मोठ्या भ्रष्ट प्रकरणाचे शहर म्हणजे धुळे हा कलंक कायम राहील.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर माजला असताना व सद्यस्थितीत ओमायक्रॉनचा उच्छाद सुरू असताना वैद्यकीय क्षेत्राने या भ्रष्ट होणे हा एक प्रकारे देशद्रोहच असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही विविध संघटनांची व नागरिकांची मागणी योग्यच म्हणावी लागेल. एका बाजूला देशात १००% लसीकरण झाल्याचा गवगवा सुरू असताना व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा वेळोवेळी माध्यमातून याचा पुनरुच्चार केला असताना अशा प्रकारच्या घटना घडणे हे देशविघातक कृत्यच म्हटले पाहिजे या सर्व १००% लसीकरणात खरे लसीकरण किती व अशा प्रकारचे खोटे लसीकरण किती याचा शोध घेणे काळाची गरज आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे