क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचं निधन

मुंबई (प्रतिनिधी) मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रंगकर्मी आणि ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं आहे. त्यामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कीर्ती शिलेदार या ७० वर्षांच्या होत्या. त्यांनी गेली ६० वर्षे रंगभूमीला दिली आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

२०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी फार मोठं योगदान दिलं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर त्या थांबल्याच नाहीत. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे