राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सराफा दुकानाचे उदघाटन संपन्न
सिल्लोड (विवेक महाजन) शहरातील सराफा मार्केट मधील नारायण वर्मा यांच्या वर्मा ज्वेलर्सला आज ३० वर्ष पूर्ण झालेत. ३० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्मा ज्वेलर्सच्या अद्यावतीकरण करण्यात आलेल्या न्यू वर्मा ज्वेलर्सचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वर्धापन दिनानिमित्त वर्मा परिवारास शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, प.स.सभापती डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, मनोज झंवर, मतीन देशमुख, प्रशांत क्षीरसागर, वर्मा ज्वेलर्सचे घनश्याम वर्मा, सुभाष वर्मा, राम वर्मा आदींची उपस्थिती होती.