महाराष्ट्रराजकीय

माहुलवासीयांना जीवनदान ; प्रकल्पग्रस्तांनी मानले राज्य सरकारचे आभार

मुबई (प्रतिनिधी) मुंबईमधील तानसा पाईपलाईन तसेच इतर प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषण असलेल्या माहुल येथे पुनर्वसन केले जात होते. माहुलमधील प्रदूषणाचा त्रास होऊन शेकडो प्रकल्पग्रस्तांना श्वसनाचा त्रास होऊन मृत्यू झाला. याविरोधात माहुल प्रकल्पग्रस्तांनी मेधा पाटकर यांच्या घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या सहकार्याने २०१७ पासून आंदोलन उभारले. न्यायालयीन लढाही उभारला. न्यायालयाच्या आदेशानुसार महाविकास आघाडी सरकारने १६०० माहुलवासीयांना प्रदूषण नसलेल्या कुर्ला येथील एचडीआयएल येथे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. माहुलवासीयांना महाविकास आघाडी सरकारने जीवनदान दिल्याने या निर्णयाचे माहुलवासीयांनी स्वागत केले असून आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

माहुल प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष जो घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या सोबत न्यायालयीन आणि जमिनी लढाईच्या माध्यमातून २०१७ पासून चालू आहे, माहुल परिसरात औद्योगिक क्षेत्रामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून आजार आणि मृत्यू भोगत शेकडो कुटुंबांनी अहिंसक मार्गाने संघर्ष केला, जो एक प्रकारचा सत्याग्रह होता. हा विषय जसा प्रदूषण आणि पर्यावरण सुरक्षेचा होता तसाच जगण्याविषयी अधिकाराचा ही होता. ज्यात पुन्हा एकदा मोठी सफलता मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एप्रिल २०१९ च्या निर्णयानुसार माहुल परिसरातील प्रदूषणाने पीडित असलेले आणि तानसा पाईप लाईनच्या विस्थापित परिवारांना कायमस्वरूपी पर्यायी घर किंवा दर महिना १५००० रुपये घर भाडे म्हणून देण्याचे होते. आम्ही माहुल वासियांनी घरभाडे नाकारत घरभाडे नको घरच पाहिजे. ही भूमिका घेतली.

माहुल प्रकल्पग्रस्त समितीच्या नेतृत्वात व्यवस्थित निकष लावून याद्या बनवल्या गेल्या. महाराष्ट्र शासनकर्ते खास करून आदित्य ठाकरे आणि उदय सामंतजी यांनी संवेदनेसह MHADA ची 288 आणि SRA ची 568 घरे दिली. त्यानंतरही आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत तथा संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेधाताई पाटकर आणि आम्ही समिती सदस्यांचा संवाद सुरूच राहिला आणि जिथे वसवले गेलेत. तिथे SRA प्राधिकरण कडे सुविधांसाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न चालू राहिले.

या सुविधा देण्यामध्ये महानगरपालिका आणि MMRDA च्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांनी माहुल मधून बाहेर जाण्यास अर्ज केला होता अशा उर्वरित १६०० कुटुंबांना घरे देण्याचे बाकी होते. आमच्या आंदोलनासह उदय सामंत आणि आदित्य ठाकरे यांच्यासह चर्चा आणि विचार विनिमया सह HDIL ने बांधलेल्या कुर्ला मधील घरांना संवेदनेसह वाटप करण्यासाठीची निर्णय प्रक्रिया चालू झाली. MMRDA च्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण सहानुभूती दाखवली.

सोळाशे कुटुंबांसाठी दुसरी कायमस्वरूपी घरे देईपर्यंत प्रीमियर कंपाउंड, कुर्ला येथे उपलब्ध घरांपैकी १६०० घरे माहूल प्रकल्पग्रस्त समितीने बनवलेल्या यादीमधील सहभागी कुटुंबांना देण्याचा अंतिम निर्णय आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि जितेंद्र आव्हाड, महानगरपालिका, MMRDA आणि SRA चे उच्च अधिकारी यांच्यासह झालेल्या २१ डिसेंबर २०२१ बैठकीनंतर समन्वय साधत आदित्य ठाकरे यांनी आज आपली जबाबदारी पार पाडली आहे.

दिवंगत नेता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. माहुल प्रकल्पग्रस्त समिती आणि घर बचाओ घर बनाओ आंदोलन जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाशी संलग्न आहे. या निर्णयाचे आम्ही मनोपूर्वक स्वागत करीत आहोत. आपली प्रदूषण मुक्त घरे मिळवण्यासाठी १६०० कुटुंबे उत्सुक आहेत.

आजही प्रदूषण चालू आहे आणि रसायनांचा पाऊस देखील पडतो तेव्हा गरजेचा होता. संघर्ष ज्यात संवेदना आणि संवादशीलता दाखवत विकास आघाडी सरकारने समस्या सोडवली आहे. आता या कुटुंबांमध्ये लवकरात लवकर घरांची सुधारणा करीत माहुलवासी कुटुंबांना चाव्या देऊन पुनर्वसित केले जाईल असा विश्वास आहे या प्रक्रियेत सहयोगाची अपेक्षा आणि विश्वास आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीमंडळ, आदित्य ठाकरे, उदय सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रति महुल वासियांनी आभार व्यक्त केला. सर्व गरिबांच्या विविध प्रश्नांवर २००५ पासून कार्यरत असलेले घर बचाव घर बनाव आंदोलन याच प्रकारे सक्रिय आणि संवादशील राहील. यावेळी नंदू शिंदे, भुईधर वर्मा, अशोक म्हसकर, महेश लिंबाचिया, श्रीकांत मोरे, रेखा गाडगे, पूजा पंडित आणि माहुल प्रकल्पग्रस्त समिती सदस्य, पूनम कनोजिया (मुंबई संयोजक), मेधा पाटकर (राष्ट्रीय संयोजक) आदी उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे