राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते अंधारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध विकास कामांचे भूमिपूजन
अंधारीच्या मूलभूत, पायाभूत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड (विवेक महाजन) अंधारी सर्कलच्या विविध विकासासाठी ग्रामविकास विभागासह इतर विभागाच्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून सर्कलच्या मूलभूत , पायाभूत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच अंधारी येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवास्थानासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अंधारी येथील विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने अंधारी येथे मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र – 6 कोटी, गावांतर्गत रस्त्यासाठी – 20 लाख, नवीन ग्राम पंचायत इमारत – 20 लाख व भूमिगत गटार – 7.50 लाख अशा जवळपास 7 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन तसेच 6 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आज सोमवार (दि.24) रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी डॉ. मनोहर गोरे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे मित्र मंडळाच्या वतीने येथील विधवा व गरजू महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि. प. चे आरोग्य सभापती अविनाश गलांडे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी जि.प. सदस्या मंगलाताई केशवराव तायडे, प.स.माजी उपसभापती अरुण ( बंडू ) शिंदे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, पंचायत समिती सदस्य सत्तार बागवान, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, मारुती वराडे, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सुनील पाटणी, सतीश ताठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल,युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, रेखा वैष्णव यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी दादाराव आहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर मराठे , जि.प. बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता योगेश लिंभारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात आरोग्य विभागाचे मोठ्या प्रमाणावर बळकटीकरण करण्यात आले असून अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या 11 महिन्यात पूर्ण होईल. रुग्णांना सोयीस्कर सुविधा देण्यासाठी येथे पूर्ण सुविधा असेल असे स्पष्ट करीत अधिकाऱ्यांनी भूमिपूजन झालेले विकास कामे गुणवत्ता पूर्वक व निर्धारित वेळेत पूर्ण करावे असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्देश दिले.
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मतदारसंघात सिंचनाची कामे हाती घेण्यात आली आहे. पूर्णा नदीवर जवळपास 42 किलोमीटर अंतरावर बॅरेजेस उभारण्यासाठी 370 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाली असून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्याचा संकल्प असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. निल्लोड ऐवजी अंधारी येथे महसुल मंडळ करणे, अंधारी गावासाठी वॉटर ग्रीड योजनेतून वाढीव पाणी पुरवठा योजना, तसेच अंधारी येथे सुरळीत वीज पुरवठा साठी गावठाण व इतर ठिकाणी रोहित्र उपलब्ध करून देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कार्यक्रमास सिल्लोडचे नगरसेवक विठ्ठल सपकाळ, राजू गौर, डॉ. दत्तात्रय भवर, विश्वास दाभाडे, युवासेनेचे प्रवीण मिरकर, बापूराव काकडे, राजुमिया देशमुख, रघुनाथ गोराडे यांच्यासाह अंधारी येथील अब्दुल रहीम, लक्ष्मण तायडे, जयवंता गोरे, अण्णा पांडव, पोपट तायडे, लक्ष्मण गोरे, बाळू गोरे, युनूस पटेल, नारायण जाधव, मनोहर गोरे, वाहेद पटेल, राजुसेट पाटणी, कैलास सोनवणे, बबन क्षीरसागर आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.