‘एसएसव्हीपीएस’ची शिवचरित्र व्याख्यानमाला
धुळे (करण ठाकरे) येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यंदाही तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित केली आहे. देवपूरातील नॉर्थ पॉईंट स् इंग्लिश मेडीयम स्कूलच्या प्रांगणातगुरुवारी सायंकाळी ७ वाजता व्याख्यानमालेचा शुभारंभ होईल.
शिवव्याख्याते गणेश शिंदे यांच्या ‘छत्रपती शिवराय व आजचा युवक’ या प्रथम पुष्पाने व्याख्यानमालेची सुरुवात होईल. शुक्रवारी शिवव्याख्याते बालाजी जाधव यांचे’तुकोबांचा शेतकरी आणि शिवरायांचा युवक’ या विषयावर व्याख्याने होईल. व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणालपाटील,अभियांत्रिक महाविद्यालयाचे चेअरमन सुभाष देवरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, प्रफुल्ल सिसोदे, उत्क पाटील, गुणवंत देवरे, शिवाज पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश नंदन, जी डी. पाटील, प्रदीप नवसारेंनी केले.