साक्री नगराध्यक्षा जयश्री पवार व उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते यांनी स्वीकारला पदभार
साक्री (सतीश पेंढारकर) साक्री शहर नगरपंचायत नगराध्यक्षा म्हणून जयश्री हेमंत पवार तर उपनगराध्यक्ष म्हणून बापूसाहेब पुंडलिक गीते यांनी नुकताच पदभार स्वीकारला. येथील नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी अकरा प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती विजय मिळवून सत्ता प्रस्थापित केली आहे.
चार प्रभागांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एका प्रभागात अपक्ष तसेच एका प्रभागात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. या पदभार स्वीकार समारंभप्रसंगी जि प सदस्य हर्षवर्धन दहिते, गरसेविका समिती संगीता भावसार, उषाबाई पवार, उज्वला विजय भोसले, मनीषा महिंद्र देसले, रेखा सोनवणे, जयश्री पगारिया, प्रवीण निकुंभ, एडवोकेट गजेंद्र भोसले, दीपक वाघ, यांचेसह शेतकी संघाचे चेअरमन विलास बिरारीस, विजय ठाकरे, पत्रकार विजय भोसले, आबा सोनवणे, हेमंत पवार, अनिल पवार, महेंद्र देसले, बाबूलाल भावसार, भरत पगारिया, विनोद पगारिया, राकेश दहिते, सुहास चाळसे, राकेश अहिरराव, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी, कार्यालयीन अधीक्षक सुनील चौधरी, जुबेर पठाण, दीपक पाटील, बंडू गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले. पत्रकार विजय भोसले यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.