शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमिताने रक्तदान शिबीर व मोफत शिवभोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील अनमोल स्वागत हाॅटेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमिताने भव्य रक्तदान शिबीर व गरजुना मोफत शिवभोजन टि शर्ट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण पाटील तसेच युवक जिल्हा उपाध्यक्ष निखील पाटील यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
सदर कार्यक्रम माजी मंत्री डाॅ.हेमंतराव देशमुख व माजी जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी भव्य रक्तदान शिबिरात १० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना शिवप्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच मोफत शिवभोजनाचा शेकडो गरजुनी लाभ घेतला. तसेच टि शर्ट देखील वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री डाॅ. हेमंतराव देशमुख, युवा नेते अमित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, युवक जिल्हा उपाध्यक्ष निखील पाटील, तालुकाध्यक्ष चिराग माळी, शहराध्यक्ष प्रविण पाटील, निलेश देसले, दोंडाईचा कार्याध्यक्ष दयाराम कुवर, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, ग्रंथालय सेल शहराध्यक्ष हर्षदीप वेंदे, विदयार्थी तालुका उपाध्यक्ष यशपाल पारधी, सागर पवार, रवींद्र पाटील, नरेश कोळी, गोपी पवार आदी उपस्थित होते. धुळे येथील जीवनज्योती ब्लड सेंटरचे शिवम गवळी, शुभम नरोडे, प्रशांत कचवे, भाग्यश्री सैदाने, बालेश्वरी गव्हाणे यानी परिश्रम घेतले.