गुन्हेगारीमहाराष्ट्र
पंचवीस फूट वरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू
धुळे (विक्की आहिरे) शहरातील रामगोपाल ऑइल मिल येथे पत्रटी शेडचे काम करताना गंजलेल्या पत्र्यावरून सुमारे पंचवीस फूट खाली पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चितोड रोड वरील रासकर नगरात राहणारे सुनिल जगन्नाथ बडगुजर वय 43 हे पत्रटी शेडचे काम करण्यासाठी रामगोपाल ऑइल मिल या ठिकाणी आले होते. यावेळी गंजलेल्या पत्र्यावरून पाय ठेवल्यानंतर त्यांचा तोल जाऊन 25 फूट खाली ते कोसळले. यात सुनील बडगुजर हे गंभीर जखमी झाले. त्यांना हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.