साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयात शिवजयंती निमित्त व्याख्यान
साक्री (प्रतिनिधी) येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयात शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळा पूजन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक नऊ वाजता वाचनालयाचे पदसिद्ध अध्यक्ष व साखरी तालुक्याचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके व साक्री नगरपंचायत नगराध्यक्षा जयश्री हेमंत पवार यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर खैरनार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ठीक पाच वाजता वाचनालयाच्या सभागृहात परळी येथील शिवव्याख्याते प्रा बालाजी फड यांचे राष्ट्रनिर्माते श्री छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्यान होईल तरी परिसरातील सर्व शिवप्रेमींनी व सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे पदसिद्ध अध्यक्ष व तहसीलदार प्रवीण चव्हाण, वाचनालयाचे उपाध्यक्ष प्राध्यापक एलजी सोनवणे, कार्यवाह डी एन खैरनार सहकार्यवाह विजय भोसले, संचालक सुरेश सोनवणे, अजीज पठाण, प्रा विनय शाह, आर डी भामरे, पी झेड कुवर, धनंजय सोनवणे, मनोज कारले, जगदीश वाघ व सांस्कृतिक समिती सदस्य आर पी भामरे, सतीश पेंढारकर, ग्रंथपाल उज्वल अग्निहोत्री आदींनी केले आहे.