महापालिकेच्या राखीव प्रभागात विकास खुंटला ; योजनेतून १ कोटी रुपये निधी मंजूर
धुळे (करण ठाकरे) शहरातील बहूसंख्य प्रभाग राखीव प्रवर्गातील असल्याने अशा प्रभागात महापालिकेकडून विकास झालेला नाही. या भागातील मुलभुत समस्या सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून १ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती शहरातचे आमदार डॉ. फारूख शाह यांनी दिली.
राखीव प्रभागात अनेक वर्षांपासुन विकास कामांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने प्रभाग क्र. १५ उदय कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १६ लाल बहादूर शास्त्री नगर येथे विविध तीन ठिकाणी कॉक्रीट रस्ता व गटार डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १८ भाईजी नगर येथे रस्ता डांबरीकरण करण्यासह गटार, पथदिवे यांची मागणी वारंवार केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होण्यासाठी सामाजिक विकास योजनेतून लेखाशीर्षका अंतर्गत १ कोटी निधी मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.



