आमदार फारूक शाह यांच्या आतोनात प्रयत्नातून धुळे शहरातील नोंदणीकृत केशरी कार्ड धारकांना अन्न, धान्याचे वाटप !
धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्रात व भारतात सुमारे २ वर्षापासून कोरोना काळामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले होते आणि अजूनही गरिबीच्या झळा सोसत आहेत. कोरोनामुळे अनेक घर उध्वस्त झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांना दोन वेळेचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या विधवा, अपंग, मतिमंद, परितक्त्या, बेरोजगार गरीब नागरिकांसाठी असलेल्या योजना कार्यान्वित होत नाहीत. अनेक नागरिकांच्या शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही अश्यांना अन्न धन्य मिळावे. धुळे शहरातील विधवा, अपंग यांची यादी महापालिकेजवळ तसेच संजय गांधी निराधार कार्यालयात असून देखील त्या कार्यालयातून यादी घेवून शासनाच्या धोरणाप्रमाणे गरीब नागरिकांना लाभ द्यावा. धुळे शहर अविकसित व बेरोजगारीने ग्रस्त असल्यामुळे या भागातील वाढती लोकसंख्या बघता आपण आपल्या स्तरावर धुळे शहरासाठी अन्न, धान्याचा इष्टांक (कोटा) वाढवून देण्याचे करावे अशी विनंती निवेदनाद्वारे आमदार फारूक शाह यांनी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली.
त्याला अनुसरून धुळे पुरवठा विभागामार्फत आधार सिडींगचे काम जलद गतीने करण्यात आले. यासाठी सातत्याने धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी पुरवठा विभागाच्या बैठका घेऊन धुळे शहरातील जनतेला आवाहन केले होते कि, ज्या केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य मिळत नाही अश्या केशरी कार्ड धारकांनी आमदार कार्यालय येथे संपर्क करावा. याठिकाणी रेशन कार्ड धारकांच्या समस्या व त्यावरील त्रुटी यांची पूर्तता करून धुळे जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, शहर अप्पर तहसीलदार संजय शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी सी. एस. चौधरी, हर्षा महाजन, प्रवीण महाले आणि इतर सर्व पुरवठा आणि आमदार फारूक शाह यांच्यासह आमदार कार्यालयातील कर्मचारी यांनी याचा पाठपुरावा करत आज धुळे शहरातील नोंदणीकृत केशरी कार्ड धारकांना रेशन दुकान क्र. ३३ येथे लाभार्थ्यांना अन्न, धान्याचे वाटप केले. याच प्रमाणे ज्या त्या रेशन दुकानांमध्ये लवकरात लवकर अन्न, धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या अन्न, धान्याचे वाटपाच्या प्रसंगी आमदार फारूक शाह, शहर अप्पर तहसीलदार संजय शिंदे, रेशन दुकान चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेश बाबा घुगे, सचिव संतोष जैन, पुरवठा निरीक्षण अधिकारी सी. एस. चौधरी, रेशन दुकानदार राजूभाई लखानी, विजय काळे, नगरसेवक युसुफ मुल्ला, सलीम शाह, नासीर पठाण, साजिद शाही, रईस हिंदुस्थानि, रफिक शाह पठाण, वासिम अक्रम, कैसर पेंटर, छोटू हाजी, इबा ठेकेदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.