सायरस पूनावाला यांना ‘पद्मभूषण’ ; महाराष्ट्रातील या १० जणांना पद्म पुरस्कार
मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातील १० जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लस उत्पादक कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह कला, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील इतर ८ जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
राज्यातील एकाला पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण तर सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापैकी डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. १२८ पद्म पुरस्कारांमध्ये चार पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आह़े. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े
संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल बिपीन रावत, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग आणि राधेश्याम खेमका (साहित्य-शिक्षण) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आह़े. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, प़ बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, कृष्णा इल्ला, सुचित्रा इल्ला, राजीव मेहऋषी, रशीद खान (कला) मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यासह १७ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आह़े.
प्रल्हाद राय अग्रवाल (व्यापार-उद्योग) नजमा अख्तर (साहित्य-शिक्षण), ज़े क़े बजाज (साहित्य-शिक्षण), ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा (भालाफेकपटू), नारायण कुरूप (साहित्य-शिक्षण), अवनी लेखारा (नेमबाज), रामसहाय पांडे (कला), शिवनाथ मिश्रा (कला), पद्मजा रेड्डी (कला) यांच्यासह विविध क्षेत्रातील १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आह़े
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत़ ‘नाव-गाव कशाला पुसता’, ‘खेळताना रंग बाईचा होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नका’ अशा एकापेक्षा एक सरस, ठसकेबाज लावणी सुलोचना चव्हाण यांनी गायली आहेत. त्यांना २०१२ साली संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
हिंदूीतील प्रसिध्द पार्श्वगायक सोनू निगम यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जवळपास तीन दशके हिंदूी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर सोनू निगम यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सोनू निगम यांनी हिंदीबरोबरच मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड, तमिळ भोजपुरी, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. १९९१ साली दूरदर्शनवर गाजलेल्या ‘चाणक्य’ या मालिकेचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेले डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. द्विवेदी यांनी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
पद्मविभूषण
प्रभा अत्रे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका
पद्मभूषण नटराजन चंद्रशेखरन : ‘टाटा’ सन्सचे अध्यक्ष
सायरस पुनावाला : ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष
पद्मश्री
डॉ. हिंम्मतराव बावस्कर : विंचू दंशावरील संशोधन
सुलोचना चव्हाण : लावणीसम्राज्ञी
सोनू निगम : पार्श्वगायक
अनिल राजवन्सी : निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिटय़ूटचे संचालक, फलटण
डॉ. विजयकुमार डोंगरे : वैद्यकीय सेवा
डॉ. भिमसेन सिंघल : वैद्यकीय सेवा
डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) : आयुर्वेद