स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनामार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरेश गुरुचळ यांना संविधान भेट
बोदवड (सतीश बाविस्कर) स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनामार्फत मुक्ताईनगर येथील तहसील आवारात व वीज कार्यालय तसेच बोदवड वीज कार्यालय येथे स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनाचे उप सरचिटणीस सुरेश गुरुचळ यांना २६ जानेवारी निमित्त संविधान भेट म्हणून देण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार संचेती, पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर व बोदवड येथील पत्रकार सुरेश कोळी, गोपीचंद सुरवाडे व यांना उप सरचिटणीस सुरेश गुरचळ यांना संविधान भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी उपस्थित म्हणून वीज मंडळाचे अधिकारी व हिंदू एकता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवकर, पदाधिकारी व उप अभियता मुंडे, साहाय्यक अभियंता पवार, जॉन उपाध्यक्ष पानपाटील, आर एम जाधव, सहायक अभियंता पवार, सहाय्यक अभियंता आशिष कुलकर्णी, सहाय्यक अभियंता चौधरी, सहाय्यक अभियंता ललिता पाटील, सहाय्यक अभियंता झोपे, उपविभागातील सर्व कर्मचारी पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.