चोपडा येथे संत रविदास महाराज यांचा जन्मदिवस साजरा
चोपडा (विश्वास वाडे) जगद्गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 645 व्या जयंती निमित्ताने चोपडा बस स्टँड शेजारील संत रविदास महाराज चौकात मोठ्या उत्साहाने संत रविदास महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष आप्पासो. भानुदास विसावे यांनी पुष्पहार अर्पण केले. यासोबत विशेष उपस्थित अरुनभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी), भैयासाहेब सुरेश पाटील (माजी जळगाव जिल्हा अध्यक्ष कॉग्रेस), जीवनभाऊ चौधरी (नगरसेवक चोपडा), नाना मोरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपाध्यक्ष जळगाव, विनोद भाऊ खजुरे जिल्हाध्यक्ष, संदेश शिरसागर साहेब डेपो मॅनेजर, जितेंद्र विसावे तालुका संघटक, परेश चित्ते सर कार्यकारी अधिकारी, संतोष बाविस्कर (इंजिनिअर), मंगल चौहान, मनोज वाघ, शेखर वाघ, दिपक विसावे, रोहिदास विसावे सर, निलेश वाघ, विक्की विसावे, समाधान शिरसाठ, पिंटूभाऊ शिरसाठ, आबा भाऊ जोशी, समाधान मामा सोनवणे, लक्ष्मण काविरे, संजय वाघ आदी समाज बांधव उपस्थित होते.