खा. नवनीत राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान
अमरावती (पंकज मालवीय) खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली. संपूर्ण देशात कुठेही फिरतांना आता खासदार नवनीत रवी राणा यांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
आता खासदार नवनीत रवी राणा यांचा विविआयपी (अति महत्वाच्या व्यक्ती) श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एस पी ओ, एन एस जी चे कमांडो, सी एस एफ चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार असून आता 24 तास हे सुरक्षा पथक नवनीत रवी राणा यांच्या समवेत राहणार आहे.
खासदार नवनीत रवी राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकार च्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढतात. देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडतात. सोबतच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात त्यामुळे त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता.
त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत रवी राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने खासदार नवनीत रवी राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक आज दुपारी अमरावतीत दाखल होत आहे. ज्यामध्ये एकूण 11 कमांडो असतील.