महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना सोयगाव परिवारातर्फे शिक्षकसेना दिनदर्शिका स्नेह भेट
सोयगाव (विवेक महाजन) महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना परिवार च्या वतीने संपूर्ण तालुक्यातील शाळांना शिक्षकसेना दिनदर्शिका स्नेह भेट देण्यात आल्या.
सोयगाव तालुक्यातील फर्दापुर केंद्र प्रमुख आण्णा पोळ, मंगलसिंग पाटील यांचे हस्ते तर सोयगाव केंद्रीतील शाळांना तालुका अध्यक्ष रविंद्र शेळके, रमेश भोलाने ज्ञानेश्वर सोनवणे यांचे हस्ते बनोटी केंद्र दिनदर्शिका वाटप आर.डी सोनवणे, विकास पवार, संदीप सोनवणे सुभाष परदेशी, समाधान चोपडे, केंद्र प्रमुख नितिन राजपूत तर वडगाव केंद्रातील दिनदर्शिका शिक्षणविस्ताराधिकारी सचीन पाटील, केंद्र प्रमुख उमेश महालपुरे, भगवान सुतार, विनोद परदेशी तसेच तिडका केंद्रातील दिनदर्शिका केंद्र प्रमुख राजकुमार निकोसे, भाउसाहेब पाटील, नाना मोरे, परमानंद जैस्वाल, अभिमान पाटील, सुभाष शिंदे ,शेवाळे, यांचे हस्ते तर गोंदेगाव केंद्रातील दिनदर्शिका शिक्षणविस्ताराधिकारी तथा केंद्र प्रमुख सचीन पाटील, तालुका अध्यक्ष चंद्रकांत निकम, ललित सोनवणे, संसारे दादाभाऊ, शोभा पाटील इतर महिला आघाडी अमृतकर, पाटील, विनोद बिंदवाल व सर्व शिक्षक उपस्थित होते.
तसेच जरंडी केंद्रातील दिनदर्शिका रवींद्र शेळके तालुकाअध्यक्ष, बाळासाहेब सुळ, बबलु गुरव, लिलाधर कोळी, अनिल सुर्यवंशी इतर शिक्षक तसेच जी.आर पाटील केंद्र प्रमुख यांचे हस्ते वाटप करण्यात आल्या. सावळदबारा केंद्रातील दिनदर्शिका केंमुअ एम डी सोनुने, मदन गायकवाड, दयानंद बाजुळगे, श्रीजय वाणी, विठ्ठल पाटील, भागवत गायकवाड नारखेडे, जनार्दन साबळे, माधुरी पवार, निता हिरास केंद्र प्रमुख शि.ब.राठोड यांचे हस्ते वाटप करण्यात आल्या. सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला तसेच उपक्रमाचे कौतुक केले.