मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते सिल्लोडच्या भूमिगत गटार योजनेचे उद्घाटन
पहिल्या टप्यात 65 कोटीचा निधी ; मलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचे भूमिपूजन
सिल्लोड (विवेक महाजन) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड शहरासाठी मंजूर झालेल्या भूमिगत गटार या महत्वकांक्षी योजनेचे उदघाटन तसेच भूमिगत गटार योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प टप्पा क्रमांक 1 मलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचे भूमिपूजन पर्यावरण तथा पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याहस्ते गुरुवार (दि.27) रोजी संपन्न झाले. या योजनेसाठी नगरविकास विभाग अंतर्गत पहिल्या टप्प्यात 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, प्रभाकर आबा काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील योजनेतून संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजनेचे काम होणार आहे. त्यासोबतच मलनिस्सारण प्रकल्प तसेच मलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून भूमिगत गटारीतील पाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी नाममात्र शुल्कात शेतीसाठी देण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यातून नगर परिषदेस काही प्रमाणात उत्पन्न मिळेल व शेतकऱ्यांना देखील मोठ्याप्रमाणात लाभ होईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड नगर परिषद अंतर्गत राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम, विकास कामे तसेच माझी वसुंधरा योजने बाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली. नगर परिषदेची विकास कामे, सामाजिक उपक्रम व कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन पाहून मंत्री आदित्य ठाकरे यांनी नगर परिषद तसेच आयोजकांचे कौतुक केले. प्रारंभी नगराध्यक्षा राजश्री निकम तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल, पुष्पहार तसेच स्मृतिचिन्ह भेट देवून स्वागत सत्कार केला.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी सय्यद रफिक, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख दीपाली भवर, मेघा शाह, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, सुधाकर पाटील , बेग चांद मिर्झा, शंकरराव खांडवे, शेख सत्तार, रतनकुमार डोभाळ, आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर, जितु आरके, अनिस कुरेशी, शकुंतलाबाई बन्सोड, मोईन पठाण, शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, युवासेना जिल्हा सरचिटणीस शेख इम्रान (गुड्डू), तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे,शहरप्रमुख शिवा टोम्पे, जिल्हा समनव्यक समाधान गोंगे, प्रवीण मिरकर, अक्षय मगर, संतोष धाडगे, रवी रासने, आशिष कुलकर्णी, रवी गायकवाड, बाजार समितीचे संचालक दामुअण्णा गव्हाणे, सतिश ताठे, मारुती वराडे, व्यापारी आघाडीचे अमृतलाल पटेल, सरपंच डॉ. दत्ता भवर, नासेर पठाण, मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, बापूराव काकडे आदींसह शिवसेना – युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.