असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष हितेंद्र महाले यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन
असंघटित कामगारांनी घेतला शिबीराचा लाभ
दोंडाईचा (प्रतिनिधी) श. प्र. येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण भवन यांच्या संयुक्त विद्यमानाने असंघटित कामगारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आर डी एम पी हायस्कूल समोर असंघटित कामगार कार्यालयात करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन असंघटित कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष तथा मनसेचे माजी नगरसेवक जितेंद्र महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार मंडळाचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन हे लाभले होते. सदर शिबिरात बांधकाम कामगारांनी, महिलांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी शिबिराला नंदुरबार येथील कांतालक्ष्मी हॉस्पिटल डॉ. तुषार वैध व त्यांचे सहकारी उपस्थित होते. दरम्यान नेत्र शिबीर यशस्वी करण्यासाठी कामगार भवन दोंडाईचा येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शिबीर उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र कामगार मंडळाचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले की, कामगार कल्याण मंडळाचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात काम करत असते. विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करणे. छोट्या शिक्षणापासून राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय शिक्षणापासून सर्व प्रकारचे खर्च करत असतात. विविध उपक्रम राबवणे हा या संघटनेचा हेतू असतो. तसेच असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष महाले यांनी मनोगतात सांगितले की, सदर शिबीर हे असंघटित कामगार महिला पुरुष तसेच गरजू गोरगरिबांनी लाभ घ्यावा असे प्रतिपाद केले.