दोंडाईचा नाभिक महिला मंडळाची बैठकीत संपन्न
दोंडाईचा (प्रतिनिधी) श. प्र. २८ नाभिक समाज महिला मंडळाची मिटींग समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा वत्सलाबाई चित्ते यांच्या शिवशक्ती कॉलनीत निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. हळदी कुंकूंवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
दरम्यान सदर बैठकीत महिलांच्या समस्या विषयी व संत सेना मंदिर आणि भवन बांधकामासाठी महिलांनी पण सहभाग घ्यावा असे विचार महिला अध्यक्षा वत्सला चित्ते यांनी महिलांन समोर मांडले. या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्षा ज्योती सैंदाणे, अर्चना चित्ते, विजया चित्ते, संगीता महाले, जयश्री सैंदाणे, अनिता भदाणे, रेखा सैंदाणे, धनश्री सैंदाणे, किरण सैंदाणे, आशा चित्ते, संगीता सैंदाणे, सोनल ईशी, भारती सैंदाणे, कवीता पवार, संध्या महाले, शोभाबाई ठाकरे, नंदा पवार, गायत्री खोंडे, पुनम चित्ते, सेजल सोनवणे, सोनल चित्ते यासह समाजातील आदी महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.