स्व. विमलताई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडाचे झाड लावून वृक्षारोपण
चोपडा (प्रतिनिधी) आज अण्णासो एस .आर. पाटील माध्यमिक विद्यालय मामलदे तालुका चोपडा येथे ग्रामविकास शिक्षण सस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ.जगदीश शिवदास पाटील यांचे काकू व संचालक जयराम रतन पाटील यांच्या धर्मपत्नी स्व. विमलताई यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयात अस्थी जमिनीत पुरून त्यावर वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.

त्याप्रसंगी वृक्षारोपण विमल ताईंचे जावई सतीश लक्ष्मण पाटील व अमृत बाबुराव पाटील (उपविभागीय अभियंता जलसंधारण विभाग जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. तेंव्हा विमल ताईंचे चिरंजीव नितीन जयराम पाटील, ताईंचे मुली जयश्री पाटील राजेश्वरी पवार नातू दिनेश पाटील, वैभव पाटील, निसर्ग मित्र समिती संपर्कप्रमुख धुळे मामलदे, गावाचे सरपंच प्रवीण युवराज पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह निवडक विद्यार्थी व नातेवाईक मंडळी हजर होते.
