गटनेतेपदी शिवसेनेचे अक्षय काळे यांची निवड
सोयगांव (विवेक महाजन) रोजी गटनेता निवडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे अक्षय काळे यांची नगर पंचायतीच्या गटनेते पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे नवनिर्वाचित सदस्य वर्षा घनगाव संदीप सुरडकर, ममताबाई इंगळे, आशियाना शाह या ४ सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून शिवसेनेच्या गटात सहभागी झाले.
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल
सोयगांव नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्याची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दि ७ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी आज नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ होता.केवळ आशाबी तडवी यांनीच अर्ज भरला दूसरा कुणाचाही अर्ज भरण्यात आला नाही.
शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख आबा काळे, शहरप्रमुख संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक भगवान जोहरे, दिपक पगारे, मंगेश सोहनी, राजू दुतोंडे, रमेश गव्हाँडे, शेख बबलू, मोतीराम पंडित, अमोल मापारी, हर्षल काळे, रउफ शेख, दिलीप देसाई, भगवान वारंगणे, गजानन कुडके, किशोर मापारी, आदी अर्ज भरताना उपस्थित होते.