जळगाव जिल्हा

स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या जळगावात

महापौर जयश्री महाजन करणार स्वागत ; २० फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणी दिवसभर उपलब्ध

जळगाव (प्रतिनिधी) साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्व.स्वामी विवेकानंद. जळगावातील श्री रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त व श्री रामकृष्ण मिशन मठ, पुणे यांच्या वतीने तसेच प्रा.डॉ.रमेश झोपे, श्रीकांत देशपांडे, श्रीधर इनामदार, प्रकाश गलवडे यांच्या अनमोल सहकार्यातून स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या बुधवार, दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी जळगावात दाखल होत आहे.

जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन या रथाचे शहरातील काव्यरत्नावली चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास यथोचितपणे स्वागत करून हा सोहळा साजरा करणार आहेत. हा रथ रविवार, दि.२० फेब्रुवारी २०२२ पर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत नियोजनाप्रमाणे ठरवून दिलेल्या शहरातील भागात उभा असणार आहे. त्यामुळे जळगावकरांना स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य खरेदीचा आनंद घेता येणार असल्याने या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे श्री रामकृष्ण मिशनच्या सर्व भक्त परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.

या ठिकाणी उभा राहणार रथ

२, ३, ६ व १३ फेब्रुवारी: काव्यरत्नावली चौक, ४ फेब्रुवारी: मू. जे. महाविद्यालय परिसर व रामदास कॉलनी, ५ फेब्रुवारी: गांधी उद्यान, ७ व ८ फेब्रुवारी: स्टेडियमच्या बाजूला, ९ फेब्रुवारी: शिवतीर्थ मैदान, १० व ११ फेब्रुवारी: सागर पार्क, १२ फेब्रुवारी: नेहरू चौक, १४ व १५ फेब्रुवारी: नवजीवन मेगा मार्ट, मानराज पार्क, १६ व १७ फेब्रुवारी: बजरंग बोगदा, १८ व १९ फेब्रुवारी: एलआयसी ऑफिसजवळ, ख्वाजामियाँ चौक, २० फेब्रुवारी: डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे