चोपडा भारतीय जैन संघटनाच्या अध्यक्षपदी निर्मल बोरा, सचिवपदी गौरव कोचर यांची बिनविरोध निवड
चोपडा (प्रतिनिधी) येथील भारतीय जैन संघटनाच्या अध्यक्षपदी निर्मल सुगनचंद बोरा, सचिवपदी गौरव शांतीलाल कोचर, उपाध्यक्षपदी मंयक सुनिल बरडीया, कोषाध्यक्षपदी अभय जीवनलाल ब्रम्हेचा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, काल दि. २४ रोजी बोथरा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ सद्स्य दिपक राखेचा हे होते. यावेळी मावळते अध्यक्ष क्षितीज चोरडिया, सचिव दिनेश लोडाया यांनी मागील दोन वर्षांचा लेखाजोखा सादर केला दोन वर्षात झालेल्या खर्चाला मंजुरी देण्यात आली तद्नंतर नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली. नविन कार्यकारणीची निवडीला सूचक म्हणून जितेंद्र बोथरा, तर अनुमोदक म्हणून शांतीलाल कोचर, लतीश जैन हे होते.संस्थेचे जेष्ठ सद्स्य राजेंद्र टाटीया माजी अध्यक्ष आदेश बरडीया यांनीही काही सूचना मांडल्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष निर्मल बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संघटना कोणीहि एकटा चालवू शकत नाही सर्वांच्या विचारावर चालत असते. आगामी काळात जे ही विधायक काम घेऊ त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. यावेळी जुन्या सदस्यांकडून दोन वर्षाची वर्गणी १००० रुपये राहणार असून तर नविन सदस्यांसाठी ५०० रुपये वर्गणी राहणार आहे असा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. शेवटी मंगलपाठ देऊन बैठकीची सांगता करण्यात आली. यावेळी राहुल राखेचा, निलेश बरडीया, मिलिंद खिलोसिया, श्रेणीक रुनवाल, आकाश जैन, भुषण जैन, हिरेंद्र साळी, शुभम राखेचा, अक्षय टाटीया आदी उपस्थित होते.