महाराष्ट्रराजकीय

धुळे जिल्हा आरटीओ कार्यालयाच्या सुसज्ज अश्या इमारतीसाठी येत्या अर्थसंकल्पात १२ कोटी रुपयांची तरतूद करा !

परिवहन मंत्री ना. अनिल परब यांना आमदार फारूक शाह यांचे साकडे !

धुळे (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज हे गेल्या अनेक वर्षापासून भाड्याच्या इमारतीतून चालविले जात होते. त्यापोटी राज्य परिवहन विभागाला लाखो रुपये खर्च करावा लागत होता. वाहनाची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय गुरुद्वार येथे तर वाहनाची पासिंग करण्यासाठी महामार्गावरील कुंडाणे फाटा येथे जावे लागत होते.

सदरचे दोन्ही ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात वाहने उभी करायला व पार्किंगला देखील जागा अपुरी पडत होती. या सारख्या अनेक लहान मोठ्या समस्या घेऊन धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि नागरिक या समस्या घेऊन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्याकडे येत होते. यावर आज मुंबई येथे मंत्री आणि आमदार शाह यांच्यात यशस्वी चर्चा होऊन आज वरील प्रश्न मार्गी लागला असे म्हंटल तर वावग ठरणार नाही. आमदार फारूक शाह यांनी याबाबत सातत्याने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीसाठी परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी यापूर्वीच आमदार फारूक शाह यांना परिवहन कार्यालयाच्या इमारतीसाठी शब्द दिला होता. आज पुन्हा आमदार फारूक शाह यांनी याचा पाठपुरावा करत लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पार पडून धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयासाच्या भव्य आणि सुसज्ज इमारतीसाठी येत्या अर्थसंकल्पात १२ कोटी रुपयांची तरतूद करा असे परिवहन मंत्री ना. अनिल परब यांना साकडे घातले आणि सदरच्या महत्वाच्या कामाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. सदरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारत झाल्याने धुळेकर आणि धुळे जिल्हयातील नागरिकांचे तसेच शासनाच्या होणाऱ्या पैशांचा खर्च व वेळेचा अपव्यय देखील थांबणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे