पंचायत समिती मोताळा येथील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा पंचायत समिती येथील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दरम्यान, मोताळा पंचायत समिती शिक्षण विभागाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी मिलींद बोदडे स्पीड न्युज महाराष्ट्र मोताळा तालुका प्रतिनिधी यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मोताळा पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा खरबडी येथील विषय शिक्षक म्हणून प्रशांत जाधव कार्यरत आहे. २०१८ पासुन शाळेवर न जाता वरच्यावर मस्टर वर सही पगार काढण्यात आला आहे. याला कोण जबाबदार? प्रशांत जाधव यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या तक्रारी झाल्या असुन वरिष्ठ अधिकारी सुध्दा प्रशांत जाधव यांना पाठीशी घालत आहे. मोताळा पंचायत समिती शिक्षण विभागात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. मोताळा पंचायत समिती शिक्षण विभागाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी मिलींद बोदडे स्पीड न्युज महाराष्ट्र मोताळा तालुका प्रतिनिधी यांनी केली आहे.