मोटर सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला बोदवड पोलिसांकडून अटक !
बोदवड (सतीश बाविस्कर) शहरातील मोटर सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला बोदवड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेले मुद्देमाल जप्त देखील जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी पोलिस स्टेशनला शेख सिकंदर शेख मुक्तार (रा. हिदायत नगर बोदवड तालुका बोदवड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून अविनाश विज्ञान बोदडे (वय २७ वर्ष रा. शेल वड तालुका बोदवड) यास ताब्यात घेतले. त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक MH19AF4707 यासह इतर दोन मोटरसायकली काढून दिले आहे. तसेच त्यांचेकडून अशाच स्वरूपाची तर गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा तपास पोहेकां /322 रवींद्र गुरचळ हे करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सफौ सुधाकर शेजोळे, पोहेका रवींद्र गुरचळ, पोहेकौ वसंत निकम, पोना शशिकांत शिंदे, पोका मुकेश पाटील, पोका दिलीप पाटील, पोका मनोहर बनसोडे, पोका ईश्वर पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी केली आहे.