गुन्हेगारीमहाराष्ट्र

बोदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल चोरट्याला अटक

बोदवड (सतीश बाविस्कर) बोदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल चोरट्याला बोदवड पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे की, दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी शांताराम लालु डांगे (वय ५५ रा. गोळेगाव तालुका बोदवड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून सदर गुन्हाबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून विलास प्रल्हाद पारधी (वय २८ रा. शेलवड तालुका बोदवड) यास ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल काढून दिला असून त्याच्याकडून अशाच स्वरूपाचे इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा तपास पोना शशिकांत महाले हे करीत आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अध्यक्ष प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अध्यक्ष चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोहेकां /783 तडवी, पोनाकां/3127 शशिकांत महाले, पोनाकां /2868 सचिन चौधरी, पोनाकां /2871 उदल चव्हाण, व पोकां /1569 निखिल नारखेडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे