महाराष्ट्र
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष संदेश देणारा फलक
सटाणा (संभाजी सावंत) नेहमीच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे उत्सव,जयंती, पुण्यतिथी, व सणवारला लक्ष वेधून घेणारा सटाणा शहरातील व्ही. पी. एन. विद्यालयाबाहेरील फलक आज जागतिक महिला दिनानिमित्त एक महत्त्वपूर्ण संदेश शाळेचे कला शिक्षक सुनिल लाड यांनी केला.
महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी 8 मार्च ला जागतिक महिला दिंन साजरा केला जातो. आज महिला फक्त चूल आणि मूलच्या चौकटीबाहेर जाऊन राजकारण, मनोरंजन खेळ, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असून सुद्धा आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष उलटून गेली तरीही स्त्रीभ्रूण हत्या सुरूच आहे.