शिंदखेडा नगर पंचायत समितीच्या सभापती निवडणूकसाठी विशेष सभा
शिंदखेडा (यादवराव सावंत) आज शिंदखेडा येथील नगरपंचायत येथे सर्वसाधारण सभेत नवीन सभापती निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापती म्हणून वंदना चेतन गिरासे, पाणी पुरवठा सभापती योगिता विनोद पाटील, स्वच्छता व आरोग्य सभापती मीरा मनोहर पाटील, महिला व बालकल्याण सभापती नर्मदा अर्जुन भिल व नियोजन सभापती हे पदसिद्ध असल्याने उपनगराध्यक्ष भिला बारकू माळी यांची सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सुनील सैंदाने यांनी कामकाज पाहिले यावेळेस मुख्यधिकारी प्रशांत बिडगर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वयेआयोजन केले. नवनियुक्त सभापती यांना आमदार जयकुमारभाऊ रावल, माजी मंत्री पर्यटन व रोहयो महाराष्ट्र, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, धुळे जि. परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, नगराध्यक्षा रजनीताई वानखेडेसह शिंदखेडा नगरपंचायत भाजपा गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे तसेच भाजपा तालुकाध्यक्ष आर.जी. खैरनार, उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देसले, माजी उपनगराध्यक्ष निर्मला माळी, अॅड विनोद पाटील, माजी नगरसेवक चेतन परमार, भाजपा OBC ता अध्यक्ष दिपक चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण माळी, चेअरमन विकास सोसायटी युवराज माळी, माजी ग्रा.पं. सदस्य अर्जुन भिल माजी ग्रा.पं. सदस्य जितेंद्र जाधव, नगरसेवक सोमनाथ माळी, नगर सेवक किसन सकट, नगरसेविका भारती जाधव, ललित पाटील, व भाजपा कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यात.