विश्वशांती परिवार यशोधामतर्फे प्रतीकचा सत्कार !
मलकापूर (प्रतिनिधी) यशोधाम येथील रहिवासी विजय धुरंदर यांचे सुपुत्र प्रतीक विजय धुरंदर याचा धुळे येथील शासकीय भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस साठी प्रवेश निश्चित झाला असून त्यानिमित्ताने विश्वशांती परिवार, यशोधाम मार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अत्यंत मेहनतीतून प्रतिकने एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळवला आहे. प्रतीकने घरीच अभ्यास करून यश संपादन केले आहे. आपल्या प्रयत्नातून वैद्यकीय प्रवेश मिळवून प्रतिकने समाजासमोर आदर्श ठेवला आहे. सत्कारावेळी तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट चे अध्यक्ष समाजभूषण हरिभाऊ इंगळे, उपाध्यक्ष वाय.के.मोरे, गोवर्धन मोहोड, बी.जे.उमाळे, अरुण लोखंडे, विजय वाघ, विनोद मोरे, नितीन मोरे, संजय धुरंदर, राजेश जाधव, विनोद इंगळे, प्रमोद मोरे, सुरेश तायडे ह्यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीने उल्हास शेगोकार, सतीश दांडगे, नत्थुजी हिवराळे यांनीही प्रतीकचा सत्कार केला.