काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित मूर्तीची चल प्रतिष्ठापना
नंदुरबार (प्रतिनिधी) मानाचा व नवसाला पावणारा श्री काका गणपती मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त पंचधातु निर्मित सोन्याचा मुलामा असलेली मूर्तीची आज गणेश जयंतीनिमित्त विधिवतपणे जल प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नंदुरबार शहरात गणेशोत्सवानिमित्त मानाचे दादा, बाबा, काका गणपतीची ऐतिहासिक परंपरा आहे. काका गणपती मंडळातर्फे मंडळाच्या सदस्यांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचा संकल्प केला होता. गणेश जयंतीच्या मुहूर्तावर पुरोहित यांच्या उपस्थितीत यजमानतर्फे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळपासून महायज्ञ मूर्ती जलाभिषेक आदी उपक्रम झाले. पूजेचे यजमान म्हणून जितेंद्र प्रदीप सोनार आणि धनश्री जितेंद्र सोनार होते. पुजेचे आचार्य म्हणून संतोष देवाळालीकर, तसेच पुरोहित प्रमोद जोशी, श्रीकांत जोशी, हेमंत त्रिवेदी, तुषार उदारे यांनी काम पाहिले. गणेश जयंती उत्सव यशस्वीतेसाठी श्री काका गणपती मंडळाचे सदस्य प्रदीप सोनार, किरण सोनार, शेखर सोनार, भरत सोनार, रुपेश सोनार, जयेश सोनार, प्रकाश सोनार, उदय कासार, कैलास सोनार, सिद्धार्थ सोनार, प्रकाश सोनार,आनंद सोनार, दीपक सोनार, तन्मय सोनार, संजय राजपूत, प्रशांत सोनार, गीरीराज पाटील आदींसह परिसरातील भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन शहरातील श्री काका गणपती मंडळातर्फे गणेश जयंती निमित्त पंचधातू मूर्तीचा जलाभिषेक अभिषेक करताना दाम्पत्य सोबत भाविक उपस्थित होते.