महाराष्ट्र

लग्नसोहळा जवळ आणि घराला लागली भीषण आग ; बापाने मुलीसाठी जमवलेलं सगळं जळून खाक !

शिंदखेडा (यादवराव सावंत) लग्न घरात स्वयंपाकाचे काम सुरू असताना अचानक गॅसचा भडका घेतल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. संसारोपयोगी साहित्यासह लग्नाचे आंदण व इतर साहित्य जळाल्यानं अल्प भूधारक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याची घटना पाटण येथे घडली आहे. त्यामध्ये घरातील सर्व साहित्य जळाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे. घरामध्ये लग्न सोहळा ऐन तोंडावर आला असताना अशी दुर्घटना घडल्यानं गिरासे कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे.

पाटण येथील कोमलसिंग गुलझार सिंग गिरासे यांच्या येथे लहान मुलीचे दि.६ रोजी लग्न कार्य नियोजित होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती. घरात नातेवाईकांची गर्दी झाली होती. काल दि.३रोजी रात्री नेहमी घराच्या वरच्या मजल्यावर स्वयंपाकाचे काम सुरू असताना, अचानक गॅसने भडका घेतल्याने आग वाढतच गेल्याने संपूर्ण घरात आग पसरल्याने घरातील सोने, चांदीचे दागिन्यांसह, सर्वच सामनाने पेट घेतला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आग वाढतच गेल्याने शिंदखेडा येथील नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब अवघ्या काही मिनिटातच हजर झाल्याने आग आटोक्यात आली. शिंदखेडा येथील नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब अवघ्या काही मिनिटातच हजर झाल्याने ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले.

आग लागल्यावर ग्रामस्थांनी सर्वात अगोदर या कुटुंबाला घराबाहेर बाहेर सुरक्षित काढल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये घरातील संसारपयोगी साहित्य, तसंच कोमलसिंग गिरासे यांच्या दीपाली नामक मुलीचे लग्न ६फेब्रुवारी रोजी असल्यामुळे घरात लग्न उपयोगी साहित्य आणि आंदण आणलेले होते. आलेल्या पाहुण्यांचे कपडेलत्ते, दाग दागिने होते ते देखील आगीत जळून खाक झाले. घर साहित्य, तूर, गहू आणि हे धान्यही जळाले. अगोदरच संकटात असलेल्या या शेतकऱ्यावर रात्रीच्या आगीच्या दुर्घटनेमुळं मोठं संकट कोसळलं आहे.

घरामध्ये मुलीचे लग्न असल्याने मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून खरेदी केलेले लग्नउपयोगी साहित्य तसंच तिला द्यावयाचे आंदण, महागडे, रुखवत, मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे ही आगीने आपल्या कवेत घेतल्यानं कोमलसिंग गिरासे यांच्या वधू मुलीसह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आगीमध्ये या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्यानं त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या दुर्घटनेच्या पंचनाम्यानंतर शासकीय स्तरावरून नुकसान भरपाईसह आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. शिंदखेडा पोलीस आगीच्या घटनेचा पुढील तपास करत आहेत. आगीत कोणालाही शारीरिक दुखापत झाली नाही,

अविनाश मुळे टळला विनाश

सुटीवर आलेल्या अग्निशमन दलातील जवानांची समयसूचकत्यामुळे मोठा अनर्थ टळला. गावात आग लागल्याचे कळताच दोन दिवसावर लग्न असल्याने गावी आला होता, अविनाश परदेशी याने तात्काळ हजर होऊन क्षणाचा ही विलंब न करता आग लागलेल्या घरात आपल्या सहकारी ,प्रदीप पवार, नितेश परदेशी(फायर फायटर) अन्य सहकर्यां सोबत घेऊन घरात शिरून आतील ग्यास सिलिंडर बाहेर आणल्याने मोठा अनर्थ टळला.अविनाश परदेशी याने प्रदीप पवार, नितेश परदेशी(फायर फायटर) अन्य गावकऱ्यांच्या मदतीने घराच्या मागील बाजूस असलेली आदिवासी वस्तीतील रहिवाश्यांना सुरक्षित बाहेर काढले .काल झालेल्या आगीत वेळीच समयसूचकता दाखवून अमोल परदेशी आपले कर्तव्य पार पाडल्याने व त्यांनी या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी त्याच्या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग केला व सुदैवाने जीवित व वित्तहानी होऊ दिली नाही म्हणून ग्रामस्थांनी अमोल याचे कौतुक केले आहे.

अग्निशमन बंब वेळेत आल्याने आग बाजूची वस्तीला आगीची झळ बसली नाही

आगीचे रौद्ररूप धारण केले होते मात्र शिंदखेडा नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब अवघ्या काही मिनिटातच हजर झाल्याने झाल्याने आग आटोक्यात आली,आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक राहुल कचवे ,प्रवीण माळी यांनी ही शर्थीचे प्रयत्न केले ,दूरध्वनी केल्यावर अवघ्या काही मिनिटातचठ नगरपंचायतिचे कर्मचारी व पदाधिकारी स्वतः हजर राहुन शर्थीचे प्रयत्न केल्या बद्दल ग्रामस्थांनी नगरपंचायतिचे आभार व्यक्त केले.

अग्निशमन बंबवर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव

असल्याने काही काळ गोधळाची स्थिति निर्माण झाली होती. बंब आल्यानंतर आग लागलेल्या घरात कोणीही प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने, पिपिई किट, मास्क नसल्याने गावातीलच अनेक तरुणांनी आत वॉटर गन हाती घेत प्रवेश केला. मात्र ऐनवेळी काही गँभिर स्थिती निर्माण झाली असती तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षण नसल्याने जीवित हानी झाली असती. नगरपंचतीने प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नियुक्ती ची मागणी होत आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे