क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांचं पार्थिव मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून सकाळी ११ ते दुपारी २:३० या वेळेत घरी आणलं जाईल, जिथे अनेक दिग्गज व्यक्ती दिवंगत लता मंगेशकर यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करतील. प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम संस्कारापूर्वी लतादीदींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे नेण्यात येणार आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने लता मंगेशकर यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे