सुरेश रैनाच्या वडिलांच निधन ; कॅन्सरशी झुंज अपयशी
गाझियाबाद (वृत्तसंस्था) भारताचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या वडिलांचं आज निधन झालं. सुरेश रैनाचे वडिल त्रिलोकचंद रैना यांना कॅन्सरचा आजार झाला होता. त्रिलोकचंद रैना हे लष्करी अधिकारी होते.
सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्याच्यासोबतच रैनाही निवृत्त झाला. रैनाने भारतासाठी १८ कसोटी, २२६ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त एकूण ७८ टी-२० सामने खेळले आहेत.
त्रिलोक चंद रैना यांनी रविवारी गाझियाबादमधील राजनगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताला दु:खी आहे. त्रिलोक चंद रैना हे भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील रैनावरी आहे. १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर रैनाच्या वडिलांनी गाव सोडले होते.
यानंतर त्रिलोक चंद रैना गाझियाबादमधील मुरादनगर येथे आले. त्यांना दोन मुले दिनेश आणि सुरेश आणि दोन मुली आहेत. सुरेश रैनाने ३ एप्रिल २०१५ रोजी प्रियंकासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काश्मिरी पंडित त्रिलोकचंद रैना यांनी आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते.