चोपडा

अवैध दारू विक्रीप्रकरणी उपायुक्त ओहोळ यांची चोपडयात भेट

चोपडा तालुक्यात विनापरवाना दारू दुकानदारांना देशी विदेशी दारू पुरवठा करणारे बार चलकाकडे उपायुक्तांनी केला कानाडोळा

चोपडा (विश्वास वाडे) चोपडा शहरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध व नकली दारूचा सुळसुळाट असून सध्या महापूर आल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना त्याच्या शारीरिक त्रास होत असून सदर महापूर थांबवावा आणि अवैध दारू विक्री करणार्‍यांवर तात्काळ कार्यवाही व्हावी आणि सदर विक्री बंद व्हावी अशी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ओहोळ यांनी चोपडा शहरांतील व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराव सचदेव यांच्या दुकानावर भेट देऊन चोपडा शहरांतील बार चालकांची बैठक घेतली. सदर बैठकीत पत्रकारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना अवैध व नकली दारू शहरात व तालुक्यांत सर्रासपणे राजरोस काउंटरवर विकली जात आहे. अनेक बार / हॉटेल परमिट नसतांना दारूची विक्री खुलेआम करीत आहेत त्यांच्यावर आज पर्यंत कारवाई का करण्यात आली नाही असे विविध प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार केला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत , निरुत्तर झाले. तसेच एकही अवैध व नकली दारू विक्रेत्या चालकावर कारवाई न करता निघून गेले. बार चालक गिरीष देशमुख यांनी परमिट असलेल्या व्यक्तींपेक्षा, परमिट नसलेल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व त्यांना अभय कोणाचे असा सवाल त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला त्यावर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले.

अवैध व नकली दारू विक्रेत्यांवर कारवाई न करता त्यांच्याकडून सर्रास राजरोसपणे आर्थिक व्यवहार करून वसुली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने अधिकाऱ्यांच्या खिसा मात्र गरम होत आहे. अवैध दारु विक्री करणारे व्यावसायिक मात्र बिनधास्तपणे खुलेआम दारू विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा करून, आर्थिक साटेलोटे ठेवून अभय दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागात गावठी हातभट्टीची दारू सर्रासपणे तयार करून विक्री होत आहे. जवळपास तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त गावाच्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र आर्थिक व्यवहार करून परत जात आहेत परंतु कायमस्वरूपी आणि विक्रीवर बंदी न करता एक प्रकारे त्यांना अभय दिल्यासारखी स्थिती आहे. त्यांच्यावर वचक राहिलेला नाही .राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप अमृतराव सचदेव यांनी केला आहे.

जळगाव येथील उत्पादन शुल्क निरीक्षक पी डी बघाव यांनी चोपडा तालुक्यात नकली बियर व नकली देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई न करता उलट त्यांच्याकडून हप्ता वसुली करून लाखो रुपये गोळा केले असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी केली आहे.

सदर बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ओहोळ, सी एस पाटील, गणेश पाटील उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शाम परदेशी, प्रवीण गुजराथी, विजय दत्तात्रय पाटील, सनी सचदेव, संजय श्रावगी, प्रफुल पाटील, गजेंद्र जैस्वाल, अजय कानडे यासह अनेक बार चालक बैठकीला उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे