महाराष्ट्रविशेष

युक्रेनचा जयजयकार करणाऱ्या भारतीय तरुणाईसाठी…!

अमरावती (महेंद्रसिंग पवार) रशियाने युक्रेन वर आक्रमण केले त्याला आता जवळपास ८ दिवस होत आहेत. बघता बघता कथित बलाढ्य व सामर्थ्यशालीअमेरिका व युरोपच्या अब्रुच्या चिंध्या करत रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानी बाहेर येऊन ठेपल आहे. आता युक्रेनचे पतन पराभव ही केवळ औपचारीकता आहे. युनो संघटनेत काल रात्री यावर मतदान झाले आणि अमेरिका व अन्य देश भारताला नैतिकतेचे डोस पाजत रशियाचा निषेध करावा व ठरावाच्या बाजूने मतदान करावे म्हणून दबाव आणत होते. अशा कठीण प्रसंगी भारत त्यास डगमगला नाही.

आंतरराष्ट्रीय राजकारण फक्त नैतिकते वर चालत नाही. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील असते आणि त्यासाठी हा महत्वपूर्ण धागा आजच्या तरुणाईसाठी – पहिले पाहूया युक्रेनचे भारताविषयीच्या आज उमाळून आलेल्या प्रेमाबद्दल –

१) सन १९९८ साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली तेव्हा भारतावर कडक निर्बंध घालणारा देश होता युक्रेन.
२) युनो मध्ये भारताविरुद्ध मतदान करणारा देश होता युक्रेन.
३) पाकिस्तानला शस्त्रास्त्र विकणारा देश आहे युक्रेन.
४) भारताला सिक्युरिटी कौंसिल मध्ये सहभागी करू नये म्हणणारा देश आहे युक्रेन.
५) सन २०१९ साली युनो मध्ये काश्मीर प्रश्नी भारताविरुद्ध मतदान करणारा देश आहे युक्रेन.

थोडक्यात हे युद्ध थांबवण्यासाठी आज युरोपाला भारताची नितांत गरज आहे. जागतिक स्तरावर मोदी एक मोठे नेतृत्व आहे. जर भारताने यामधे हस्तक्षेप केला तर पुतिन त्यावर नक्कीच विचार करतील आणि या युद्धाला कुठेतरी पूर्णविराम मिळेल हे युरोप चांगलेच जाणून आहे. कारण भारताचे रशियासोबत खूप जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. युक्रेनला लढ म्हणणाऱ्या त्याच्या मित्रांनीच त्यांना दगाफटका केला आहे. शहरेच्या शहरे बेचिराख होत असताना युरोपीय देश कुणीही युक्रेनच्या मदतीला आला नाही. युक्रेनने जगातील प्रत्येक देशाकडे मदतीचा हात मागितला मात्र कुणीही देश पुढे आला नाही. आर्थिक आणि शस्त्रास्त्र यांची मदत जाहीर करून अमेरिका नाममात्र निराळा राहिला. गेल्या ७ दिवसात रशियाने युक्रेनची अक्षरश: चाळण केली मात्र कोणत्याही देशाने प्रत्यक्ष सैन्य युक्रेनच्या मदतीला पाठवले नाही. युरोपीय देशांनी विशेषता अमेरिकेने आज या युद्धासाठी युक्रेनला भाग पाडले आणि युक्रेनची अवस्था आज संपूर्ण जग पाहत आहे. हा झाला युक्रेनचा भाग.

आता रशिया कडे वळूया. भारत जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा मदतीला धावूनआलाय फक्त आणि फक्त रशिया. आज पाहूया ५० वर्षांपूर्वीची घटना जी विस्मृतीत गेली आहे. वर्ष होते १९७१, महिना डिसेंबर. भारत तेव्हा पाकिस्तान विरुद्ध युद्धात सर्व शक्तिनिशी उतरला होता. जे युद्ध बांगला मुक्तीचे युद्ध होते. पाकिस्तानचा साथी अमेरिकेने भारताला धमकी दिली कि युद्ध थांबवावे अन्यथा त्याचे अत्यंत वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील.

सावध होऊन भारताने रशियाला मदतीचा  SOS (Save Our Ship) पाठवला. जेव्हा पाकिस्तानचा पराभव होणार हे स्पष्ट दिसू लागले तेव्हा हेन्री किसिंजर (अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) ने राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांना सांगून अमेरिकेची सर्वात मोठी आण्विक विमानवाहू नौका USS ENTERPRISE (CVN-65) बंगालच्या उपसागरात पाठवायचे ठरवले. हे जहाज त्यावेळी जगात सर्वात मोठे ९४,००० टन वजनी जहाज होते आणि ज्याची ९० विमाने वाहून नेण्याची क्षमता होती. याच्या तुलनेत भारताकडे होते १९,५०० टन वजनी INS विक्रांत ज्याची विमान वाहून नेण्याची क्षमता होती जवळपास २१-२३ विमानांची. अमेरिकन जहाजाचा हेतू होता बांगला देश मुक्त होणे थांबवणे. दुर्दैवाने लवकरच भारताला अजून एक वाईट बातमी मिळाली. रशियन गुप्तहेर खात्याने भारताला सावध केले कि ब्रिटिश नौदल देखील त्यांची खूप आरमारी जहाजे अरबी समुद्रात पाठवत आहे. ज्याचे नेतृत्व HMS EAGLE (R05) हे ३०-३५ विमाने वाहून नेण्याची क्षमता असलेले ५५,००० टन वजनाचे ब्रिटिश विमानवाहक जहाज व कमांडो कॅरियर ALBION करत आहे.भारताची अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात अशी दोन्ही बाजूने कोंडी करण्याचा ब्रिटिश व अमेरिकी नौदलाचा दुहेरी डाव होता.

अशा प्रकारे सन १९७१ साली जगातील २ आघाडीचे लोकशाही देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाला धमकावत होते. तेव्हा भारताने तातडीचा मदतीचा निरोप मॉस्कोला पाठवला. रशियन नौदलाने ताबडतोब १६ आरमारी जहाजे आणि ६ आण्विक पाणबुड्या व्लॅडिवॉस्टॉक येथून रवाना केल्या. ज्याचा हेतू होता USS ENTERPRISE ला थोपवणे. ऍडमिरल एन. कृष्णन जे तत्कालीन नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. त्यांनी त्यांचे पुस्तक NO WAY BUT SURRENDER मध्ये लिहिले आहे  कि त्यांना एक गोष्ट सतावत होती की अमेरिकन युद्ध नौका चिटगॉन्ग बंदरावर हल्ला करेल. म्हणून त्यांनी मारो अथवा मरो या इर्षेने प्लॅन ही बनवला होता. डिसेंबर १९७१ चा दुसरा आठवडा. महाकाय अमेरिकी युद्ध नौका बंगालच्या उपसागरात येऊ लागली आणि ब्रिटिश युद्ध नौका अरबी सागराकडे निघाल्या. संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला की आता विश्व युद्ध पेटते की काय. पण अमेरिकी युद्ध नौका अनभिज्ञ असतानाच अचानक बंगालच्या उपसागरात त्यांनी रशियन आण्विक पाणबुड्या पाहिल्या ज्या त्यांची वाट अडवून उभ्या होत्या. अमेरिकन युद्ध नौकेवरील सैनिकांना धक्का बसला. ऍडमिरल गॉर्डन ने कळवले

आपल्याला उशीर झाला. रशियन आधीपासूनच इथे उभे आहेत. अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलाने आल्या पावली माघारी जाण्याचा निर्णय घेतला. आज ही घटना विस्मृतीत गेली आहे. त्याला या निमित्ताने दिलेला हा उजाळा आणि आपला सच्चा मित्र कोण हे दाखवून देण्यासाठी लिहिलेला हा लेख. म्हणून मित्रांनो, युक्रेनची जास्त खंत किंवा जय जयकार करू नका. माणुसकीची जबर किंमत भारतालाही चुकवावी लागली आहे. भारताचा ५० वर्षे जुना मित्र रशिया आहे आणि म्हणून मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याची भारताची भूमिका देखील अगदी योग्य आहे. या निमित्ताने अमेरिकेचा दूसरा चेहरा जगासमोर आला आणि अमेरिकेच्या महासत्ता होण्याच्या सुप्त इच्छा आकांक्षा राशियाने धुळीस मिळवल्या.

– एक निवृत्त नौदल कमांडर

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे