मोताळा तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायत बनली भ्रष्टाचाराचा अड्डा
मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोराखेडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे.
सविस्तर वृत्त असे की, बोराखेडी ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून गटारीचे बाधंकाम सुरू आहे. ते अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. या मध्ये सचिव हे आपली स्वता:ची तिजोरी भरण्याकरीता शासनाची फारमोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे. बोराखेडी ग्रामपंचायतचे सचिव हे अंदाज पत्रकानुसार काम न करता शासनाची फसवणूक करत आहे. पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी सुध्दा यांना पाठीशी घालत आहे. यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहले नाही म्हणून शासनाचे कर्मचारी हे शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन आपली मनमानी कारभार करत आहे. जो पर्यंत या कामाची चौकशी होत नाही. तो पर्यंत या कामाचे बिल काढण्यात येनु नये, अशी मागणी स्पीड न्यूजचे मोताळा तालुका प्रतिनिधी मिलींद बोदडे यांनी मोताळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.