हरताळे येथील श्री साई मंदिरास खा. रक्षाताई खडसेंची सदिच्छा भेट ; विकास कामांचीही केली पाहणी
मुक्ताईनगर (सचिन झनके) खासदार रक्षाताई खडसे यांनी हरताळे (मुक्ताईनगर) येथील तलावामध्ये बांधण्यात आलेल्या श्री साई मंदिर येथे सदिच्छा भेट देऊन प्रतिष्ठाण च्या वतीने सत्कार स्विकारला व साईंचे दर्शन घेतले. तसेच सदर परिसरात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकांची पाहणी केली.
सदर मंदिर माझ्सायाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असुन, येथील साई बाबांची मूर्ती ही मार्फत पुरविण्यात आलेली आहे. तसेच सदर परिसराच्या विकासासाठी विविध योजना अंतर्गत येथे अनेक विकास कामे येथे मंजूर करण्यात आलेली आहे. सदर ठिकाण हे जिल्ह्यातील एक निसर्गरम्य पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत असुन, दररोज येथे साईभक्त व निसर्गप्रेमींची जत्रा बघण्यास मिळत आहे, असं खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या.
यावेळी माझ्यासह हरताळे गावाचे माजी सरपंच जयेश कारले, भरतकुमार जैन, भागवत दाभाळे, संजय पाटील, रविंद्र महाजन, आदेश कारले, गजानन ठाकुर यांच्यासह श्री साई प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.