जळगाव जिल्हामहाराष्ट्र
मलकापूर येथे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांचे स्वागत
मलकापूर (प्रतिनिधी) मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांचे आयडियल जर्नालिस्ट असोसिएशन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती तसेच पत्रकार संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देवून हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकार तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे प्रसिद्धी प्रमुख पंकज मोरे, पत्रकार धर्मेशसिह राजपुत व अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे संपर्क प्रमुख कैलास गणगे उपस्थित होते. यावेळी ठाणेदार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.