सिल्लोड येथे ५ हजार भाजप कार्यकर्त्यांचा होणार शिवसेनेत जाहीर प्रवेश ; अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट
सिल्लोड (प्रतिनिधी) सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन वेळेस जोरदार धक्का दिल्यानंतर आता भाजपचे अनेक जण संपर्कात असून सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील ५ हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असून विधानसभा मतदारसंघात कमळाबाईचा बंदोबस्त करणार असल्याचा गर्भित इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला. कोरोनाचा प्रादुर्भाव संपताच हा प्रवेश सोहळा घेणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यामुळे भाजपच्या गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे कार्यप्रणाली व शिवसेनेवरील लोकांचा विश्वास यामुळे शिवसेना लवकरच क्रमांक एकचा प्रश्न बनेल असा विश्वास देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.