नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा ; धारणी तालुका भाजपचे तहसीलदारांना निवेदन !
धारणी (पंकज मालवीय) भारत्तीय जनता पार्टी धारणी तालुक्याचा वतीने आज महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेवून ३ मार्च पर्यंत रिमांड दिली असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेचे शासकीय कामात विलंब होवू नये यासाठी नवाब मलिक यांचे राजीनामा घेण्याबाबतचे निवेदन राज्याचे महामहिम राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवेदन तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले.

सदर कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेता रामदासजी नालमवार, सुधाकर पकडे, श्याम गंगराडे, भाजपा धारणी तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर, रमेश मावस्कर, नगर सेविका क्षमा चौकसे, मानिषकुमार पांडेय, सुशील गुप्ता, किसान आघाडीचे अध्यक्ष सुहास सालफडे, भटक्या जाती धारणी ता. अध्यक्ष धोंडीबा मुंडे, अनु. जाती धारणी ता. अध्यक्ष अॅड. संतोष कलमेकर, OBC आघाडी धारणी ता. अध्यक्ष रमेश मालविय, सरपंच विनोद पाटणकर, अंबर बन्सोड, महामंत्री सुनिल लखपती इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



