शांततेत गणपती विसर्जन खांद्यावर उचलून नागरिकांनी पोलिसांचे केलेत आभार व्यक्त
अखिलेशकुमार धिमान
भुुुसावळ : गणपती विसर्जनासाठी श्रींची ३५ मंडळाची मिरवणुक शासनाने ठरवलेली वेळेप्रमाणे व संवेदनशील भागातून अगदी शांतपणे पार पडल्याचे जोश पोलिसांना ही रोखता आले नाही. सविस्तर वृत्त असे कि, कोरोना काळाचे दोन वर्षानंतर यंदा गणपती उत्सव साजरा करण्यात आला. व या साठी भुसावळात एकुण ३५ मंडळांनी “श्रीं” ची स्थापना करुन १० दिवसासंतर काल दि.९ रोजी बप्पांना जल्लोषात निरोप दिला. संपूर्ण शहरातील मिरवणुक ही मुख्यबाजारपेठेतून तापी व वाघूर नदी काठी विसर्जनासाठी पोहोचली.
भुुुसावळ शहराला लाभलेले कर्मठ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरात अप्रिय घटना घडू नये या साठी जळगांव चे जिल्हापोलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंढे व
अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचा मार्गदर्शनाखाली नगरपालिका चे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचासह योजनेबद्ध नियोजन करुन सर्व मिरवणूक शांततेत पार पाडली. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी स्वत:भुुुसावळ शहरात तळ ठोकुन होते. शेवटी सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्याचे आनंद पोलिसांनी ही व्यक्त केले शेवटची श्री साई मंडळाची मिरवणूकात मंडळाचे व सार्वजनिक गणेशोस्तव समीतीचे पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यांनी अप्परपोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे,नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार सह सर्व पोलीस व प्रशासनाचे कर्मचारांनी सुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरला.