शिंदे सरकारने मारली बाजी ; अध्यक्षपदासाठी मिळवली 164 मतं
राहूल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते.
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली आहे. शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित झाली आहे.
दरम्यान,या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे. या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे. या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला.