अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांवर कारवाई करा ; आमदार शाह यांचे गृहमंत्र्यांना निवेदन
धुळे (करण ठाकरे) शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सरासपणे सुरू आहे. वाढत्या गुंडगिरीवर तसेच अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा वचक न राहिल्याने शहरातील नागरिक असुरक्षित झाले आहे. शहरातील अवैध धंद्यांना जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले.
गेल्या काही आठवड्यात शहरात चैन व मंगळसूत्र हिसकावून पळून जाणे अवैध जुगार अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरु असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यात शंभर फुटीरोडवरसह इतर ठिकाणी नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीनहोत आहे. महाविद्यालय परिसरात महिला व युवतींना होत असलेली छेडखानीच्या प्रकारामुळे महिला असुरक्षित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिरपूर तालुक्यातील चारण मोहल्ला येथे मोठा जुगार अड्डा बिनधास्तपणे सुरू आहे. येथील बनावट मद्य बनविण्याचा कारखाना नाशिक उत्पादन शुल्क विभागाने उदध्वस्त केला होता. मात्र याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला काहीही भूमिका घेतली नाही. शहरात सर्रासपणे सुरु झालेल्या अवैध व्यवसायासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा अशा आशयाचे निवेदन शहराचे आमदार फारुक शाह यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले.