महाराष्ट्र
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथे उद्योजकता विषयावर कार्यक्रमाचे आयोजन
बोदवड : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई व उद्यम लर्निंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड जि. जळगाव येथे उद्योजकता या विषयावर कार्यक्रमाचे उद्घाटनपर आयोजन करण्यात आले.
संस्थेचे प्राचार्य टी.आर.पाटील, गट निर्देशक एस.एन.पाटील, एस.ऐ.पाटील मंचावर उपस्थित होते. उद्योजक शिलते विषयी प्राचार्य टी.आर.पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच शि.नि. व्ही.टी.माहजन यांनी पंच्युयालीटी विषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तर शि.नि.तुषार पाटील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले प्रशिक्षक के.जे.सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करून उद्यम लर्निंग विषयी प्रस्तावना सादर केली. उद्घाटन कार्यक्रमाला शि.नि. एम.वाय.पुनासे, के.एम.सुर्यवंशी , व्ही.एस. मोरे, सोनवणे.व्ही.बी व इतर सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले.