मनसेचे अविनाश जाधवांच्या नेतृत्वाखाली शहापुर तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांच्या मनमानी कारभारा विरोधी धडक मोर्चा
शहापूर : शहापुरच्या तहसीलदार गेली तिन वर्ष जेथुन रुजु झाल्या तेथुन आज पर्यंन्त काम कमी नी वाद जास्त या मधेच तिन वर्ष निघुन गेली. मात्र या सर्व प्रकारात सामान्य शेतकरी अधिक वेठिस धरला गेला आणि आजही या सर्वांचा त्रस सामान्य माणसाला अधिक होतोय. अव्वल कारकुन ते तहसीलदार पदावर गेलल्या सर्यवंशी तालुक्यात आल्यानंतर त्यांची वैतरना रेती, चोरी अशी तुरळक प्रकरणे पाहता जनतेला कुठेतरी या महिला अधिकार्याकडुन न्यायाची आशा लागली होती. पण कसले काय अगीतुन फुफाट्यात अशी अवस्था शहापुरकरांची झाली. नेहमीच वागणे कामाचे स्वरुप याला कंटाळुन पत्रकारांनी पहिले उपोषण केले. ही मालीका ईथेच थांबली नाही कधी कार्यालयात वाढदिवस साजरा करण्याच्या तक्रारी तर कधी राष्ट्रीय झेंड्याला मानवंदना देण्याच्या तक्रारी यासारखी अनेक प्रकरणे झाली.
परंतु या सगळ्यात मोठा विषय ठरला तो शिवरायांच्या प्रतिमेला चप्पल घालुन हार घालने तसेच दिपप्रज्वलन करणे, उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांशी अरेरावीने बोलने…या प्रकाराबाबत मनसेने आज शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्यानै आज धडक मोर्चा तहसीलदार कार्यालयाला दिला. यावेळी मनसे अरेरावी खपवुन घेणार नाही असे सांगत तहसीलदार यांनी बिल्डर व्यापार्यांना आकारलेले दंडाचे काय झाले. रेशनकार्ड वासराची प्रकरणे ही आर्थीक देवाणघेवाणसाठी प्रलंबित ठेवणे, चुक दुरुस्ती कोतवाल बदल्या, त्यांना दिलेली मुदतवाढ अशा विविध विषयांचे निवेदन दिले गेले.
यावेळी बोलतांना अविनाश जाधवांनी तहसिलदार यांनी छावा संघटनेच्या एका शिवप्रेमीला दिलेली धमकीचाही खुलासा केला. शिवरायांचा अपमान झाला म्हणुन शिवतिर्थावर अभिषेक करा असे पत्र देणाऱ्या एका शिवप्रेमीला तहसीलदार धमकीत माझे पती मंत्री गडाख यांच्याकडे OSD आहेत अशी सुरुवात करुण त्यांचे संस्कार काढे पर्यन्त झापले अशी वागणुक एक अधिकारी देत असेल तर तालुक्याचे भविष्य कठीणच आहे.
एक तहसीलदार म्हणजे दंडाधिकारी जो एका न्यायाधिशाच्या जागी आहे पण हे सर्व कमी की काय तहसीलदार यांनी सर्व तालुका अध्यक्षांचे लेटर पॅड स्वताजवळ मागवले. हे जाधव यांच्या भाषणातुन समजले. काल रात्रीपासुन शहापुर मधील अनेक गृपवर भाजप अध्यक्ष भास्कर जाधव आणी शिवसेना तालुका अध्यक्ष मारुती धिर्डे यांचे पाठींब्याचे पत्र फीरत आहे. शहापुर तालुक्यातील ह्या प्रकाराला आता जनतेने घर का भेदी लंका ढाए अस समजायचे का? एकीकडे विद्यमान तहसीलदारां बाबत तालूक्यात उपोषण आंदलने होत असतांना ही पाठींब्याची पत्र म्हणजे जनतेच्या भावनांशी जनतेच्या प्रश्नांशी जनतेच्या त्रासाशी केलेली गद्दारी समजावी का? या दोनही पत्रांमधिल सारखाच मजकुर सर्व शब्द शब्द सारखेच मग हा लेटर पॅडचा गैरप्रकार समजावा का? जर गैरवापर केला मग सही करणारे अनपढ हौते का? त्यांनी कारवाईची मागनी का केली नाही?त्यांचे शांत राहणे म्हणजे त्यांचा स्वार्थ आहे का? अशी लाचारी जर तालुक्यात होत असतील असे घरातलेच अनाजीपंत असतील तर काय अवस्था असेल या तालुक्याची..!
या तालुक्याने अणेक अधिकारी अणेक परुंतु एवढा त्रास जनतेला याआधी कधीच झाला नाही. त्यात हे स्वकीयच फीतुर असल्याने हे लोक सोकावतात याचा त्रास सामान्य मानसाला होतो. या आंदोलनातुन अनेक सत्य बाहेर आली. जनतेला दुतोंडी नेते समजले याचा परीणाम नककीच पुढच्या निवडणुकांवर झाल्या शिवाय राहनार नाही. जनतेचे खरे गुन्हेगार कोण ? हे ही जानता आहे. या मोर्चातुन नक्कीच सामन्य जनतेला दिलासा मिळाला. या मोर्चाचे फलीत जर दिसले नाही तर येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे अविनाश जाधव यांनी यावेळी सांगीतले.