महाराष्ट्र
सोयगाव येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सोयगाव : सोयगाव येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालयात शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे व सुरेखा काळे उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, सोयगाव नगरपंचायत च्या उपनागराध्यक्षा सुरेखा काळे, शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे, भगवान जोहरे, संदीप सुरळकर तसेच मोतीराम पंडित, भगवान वारंगणे, कदीर शहा, राजू दुतोंडे, शेख रउफ, किशोर मापारी, संदीप चौधरी, जाकीर देशमुख, नंदू हजारी, राजेश सोनवणे, डॉ.राठोड, राजू म्हस्केसह इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती.